ई-पीक पाहणी म्हणजे काय? | ई-पीक पाहणी कशी करायची?| What is E-Pik pahani?

ई-पीक पाहणी म्हणजे काय? (What is E-Pik pahani?)-

राज्य सरकारने पीक पेरणीची माहिती गाव नमुना नंबर 12 मध्ये नोंदविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतः भ्रमणध्वनीवरील ॲपद्वारे ही माहिती उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम टाटा ट्रस्टने विकसित केलेला आहे. इ-पीक पाहणीचा वापर 15 ऑगस्ट 2021 पासून राबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती गठित करून करण्यात येणार आहे.

ई-पीक पाहणी

ई-पिक पाहणी द्वारे माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून पीक पाहणी जलद आणि पारदर्शक पद्धतीने करून माहिती संकलित करण्यात येणार आहे. यामुळे तलाठ्यांचे काम सोपे होणार आहे. या ॲपच्या माध्यमातून अधिक प्रमाणित रियल टाईम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे शेतकरी स्वतःच्या शेतातील उभ्या पिकाची माहिती अक्षांश रेखांश दर्शवणाऱ्या पिकाच्या छाया चित्रासह उपलब्ध होऊ शकणार आहे.

ई पिक पाहणी करणे का आवश्यक आहे

ई-पीक पाहणीचा फायदा पीक दाव्यांमध्ये होणार आहे. काही कारणामुळे ई पीक पाहणी आणि Crop Insurance यामध्ये तफावत आढळून आल्यास ई पीक पाहणी गृहीत धरली जाणार आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभागाकडून देण्यात येणाऱ्या योजना जसे ठिबक तुषार सिंचन इत्यादी योजनांचे लाभ खातेदारांना देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.

ई पीक पाहणी केल्याचे फायदे (Benefits of e-pik pahani)-

महाराष्ट्रा ई पीक पाहणी नोंदणीला खूप शेतकरी बंधू प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे ई पीक पाहणी ॲप मध्ये शेतकरी बांधवांच्या सहभाग वाढला आहे. त्यामुळे ई पीक पाहणी ॲपमुळे शेतकरी बांधवांच्या एक पेरणीची अचूक नोंद होते. तसेच शेतकरी बांधवांचे नुकसान होत नाही आणि महाराष्ट्र सरकारची फसवणूक होत नाही. ई पाहणी केल्याचे काही फायदे खाली देण्यात आले आहेत.

1) ई पीक पाहणी सोप्या पद्धतीने व कमी वेळात ऑनलाइन ॲप च्या साह्याने केली जाते.
2) पिक विमा (Crop Insurance) प्रक्रियेला आणि पीक पाहणीचे दावे निघाली काढण्याची प्रक्रिया आहे खूपच सोप्या पद्धतीने होते.
3) ई पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना पिक कर्ज सुद्धा सुलभ तऱ्हेने मिळते.
4) शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास ई पीक पाहणी मुळे शेतकरी बांधवांना आर्थिक मदत सुद्धा दिली जाते.
5) महाराष्ट्र राज्यातील चालू वर्षी शेतकरी बांधवांनी कोणकोणत्या पिकांची लागवड केली आहे आणि पिकांची लागवड किती केली आहे ही सर्व माहिती ई पीक पाहणी मुळे करणार आहे.
6) कृषी क्षेत्रात योग्य नियोजन करणे ई पीक पाहणी मुळे शक्य होणार आहे.
7) यावर्षी ज्या शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान झाले आहे त्यांच्या पिक विमा दावे निकाले काढण्याकरिता ई पीक पाहणी उपयोगी ठरणार आहे.

ई-पीक पाहणी कशी करायची? –

1) ई पीक पाहणी करणे खूपच सोप आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम मोबाईल मध्ये Play Store ओपन करून त्याच्या सर्च बार मध्ये ई पीक पाहणी ॲप डाउनलोड करायचे आहे.

2) ॲप डाऊनलोड झाल्यानंतर त्याला ओपन करून, तुम्हाला स्वतःच्या जिल्हा, तालुका, गाव निवडायचे आहे त्यानंतर तुमच्या खातेदार निवडा किंवा गट क्रमांक टाका.

3) हे सर्व माहिती बरोबर भरल्यानंतर तुमच्या परिचय निवडायचे आहे. त्यानंतर होम पेजवर येऊन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. त्यानंतर होम पेजवर तुम्ही जे पीक घेत असाल त्या पिकाची माहिती भरायची आहे.

4) माहिती बरोबर भरल्यानंतर तुमच्या जमिनीच्या खाते क्रमांक निवडायचे आहे. गट क्रमांक निवडल्यानंतर तुमच्या शेतीचे क्षेत्र निवडायचे आहे. त्यानंतर हंगाम निवडायचे आहे.

5) त्यानंतर तुम्ही जे पिक घेत असाल त्या पिकाच्या प्रकार निवडायचे आहे. तुम्ही जर एक पीक घेत असाल तुम्हाला निर्भेळ पीक (Single Crop) हा पर्याय निवडायचा आहे. किंवा तुम्ही एकापेक्षा जास्त पीक येत असाल तर बहुपिक का पर्याय निवडायचे आहे.

6) ही सर्व माहिती भरल्यानंतर तुमचा पिकाचे नाव निवडा, सिंचन पद्धत विहीर आहे का कोरडवाहू आहे अश्या प्रकारचा पर्याय निवडायचा आहे. आता तुम्ही ज्या दिवशी पीक पेरणी केली असेल त्या पिकाचा लागवडीची तारीख निवडायची आहे.

7) वरील सर्व माहिती भरल्यानंतर मोबाईल मध्ये GPS किंवा Location पर्याय चालू करायचे आहे. कारण तुम्ही कोणत्या ठिकाणाहून पीक पाहणी केली ही माहिती ॲप मध्ये राहणार आहे.

8) त्यानंतर तुमचा शेतातील मुख्य पिका जवळ उभे राहून फोटो काढून ई पीक पाहणी ॲप मध्ये अपलोड करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे. अ

9) आश्याप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने पिकाची पाहणी ऑनलाईन पद्धतीने ई पाहणी या ॲप च्या साहाय्याने करू शकता. तुमच्याकडे जर अँड्रॉइड मोबाईल नसेल तर तुम्ही दुसऱ्याच्या मोबाईल वरुन सुध्दा पीक पाहणी करू शकता.

10) एका मोबाईल वरून 20 खातेदारांची पीक पाहणी करू शकतात. (pik pahani kashi karavi)

ई पीक पाहणी शेवटची तारीख (e pik pahani last date)

शेतकऱ्यांसाठी करण्याची पिक पाहणी (महिना)
खरीप पिकासाठी पाहणी कालावधी – ऑगस्ट ते ऑक्टोंबर
रब्बी पिकासाठी पाहणी कालावधी – नोव्हेंबर ते जानेवारी
उन्हाळी पिकासाठी पाहणी कालावधी – फेब्रुवारी ते एप्रिल

तलाठी स्तरावर करण्याची पिक पाहणी (महिना)
खरीप पिकासाठी पाहणी कालावधी – ऑक्टोबर ते नोव्हेंबर
रब्बी पिकासाठी पाहणी कालावधी – फेब्रुवारी पूर्ण महिना
उन्हाळी पिकासाठी पाहणी कालावधी – एप्रिल ते मे

ई पीक पाहणी नवीन सुविधा (E Crop Inspection New Facility)

) पिक पाहणी कमीत कमी 10% तपासणी तलाठ्यांमार्फत होणार आहे
2) Geo Fencing सुविधा आहे
3) शेतकरी ई पीक पाहणी स्वयंप्रमाणित मान्यता आहे
4) 48 तासात ई पीक पाणी व दुरुस्ती सुविधा आहे
5) मिश्र पिकांमध्ये इतर तीन मुख्य पीक नोंदवण्याचे सुविधा आहे.
6) संपूर्ण गावाची ई पिक पाहणी बघण्याची सुविधा आहे
7) ॲपची अभिप्राय रेटिंग ची सुविधा आहे
8) खाते अपडेट करण्याची सुविधा आहे

Download ई-पीक पाहणी (E-Peek Pahani App)

Click on this link – https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova

Leave a Comment

5 facts about Devid-Warner अवतार 2 : जेम्स कैमरून की फिल्म ने रिलीज से पहले मेकर्स को किया मलामाल | बाल दिवस के मौके पर जानिये पंडित जवाहर लाल नेहरू के विचार (Thoughts Of Pandit Nehru ) tornado warning India VS England T20 Match