महाराष्ट्र एक्सप्रेसवेवर बसला आग लागल्याने 25 जणांचा मृत्यू
चालक आणि कंडक्टर ताब्यात घेतले

Maharashtra Bus Accident – पुण्याकडे निघालेल्या बसमध्ये सुमारे 33 लोक होते,समृद्धी-महामार्ग द्रुतगती मार्गावर पहाटे 1.30 च्या सुमारास हा अपघात झाला. आग लागून तीन मुलांसह किमान २५ जणांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले, चालक आणि कंडक्टर ताब्यात घेतले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, समृद्धी-महामार्ग द्रुतगती मार्गावर पहाटे 1.30 च्या सुमारास हा अपघात झाला.
एक्स्प्रेस वेवर खांबाला धडकल्यानंतर बस उलटली आणि आग लागली.
या घटनेतून बचावलेल्या बसच्या चालकाने सांगितले की, टायर फुटल्यानंतर बस खांबाला धडकली. अपघाताच्या वेळी बहुतांश प्रवासी झोपलेले होते बस दरवाजाच्या बाजूला उलटली त्यामुळे कोणीही बाहेर पडू शकले नाही, असे ते म्हणाले.

तसेच अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे, मृतदेहांची ओळख पटवणे आणि ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करणे, असे बुलढाण्याचे पोलिस अधीक्षक सुनील कडासणे यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचेही निर्देश दिले आहेत, असे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.
मृतदेह ओळखण्यापलीकडे जळाले असून, मृतांची ओळख पटली नाही, तर डीएनए चाचणी केली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
तसेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
